बांद्यात मराठी वाचनसंस्कृतीला बळ

बांद्यात मराठी वाचनसंस्कृतीला बळ

Published on

21072

बांद्यात मराठी वाचनसंस्कृतीला बळ

नट वाचनालयाच्या वाचन स्पर्धेत दूर्वा, मृदुला प्रथम

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३१ ः मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांमधील वाचनकौशल्य वाढावे, या उद्देशाने येथील नट वाचनालयात आयोजित प्रकट वाचन स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात दूर्वा नाटेकर व आठवी ते दहावी गटात मृदुला सावंत यांनी प्रथम क्रमांक मिळविला. हे दोन्ही दिव्य ज्योती स्कूल, बांदाचे विद्यार्थी आहेत.
सावंतवाडी तालुका मर्यादित आयोजित या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण २७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेची रोख रकमेची पारितोषिके सुरेश डेगवेकर (पानवळ-बांदा) यांनी आपली पत्नी सुवर्णा डेगवेकर यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केली होती. पाचवी ते सातवी गटात प्रांजल सावंत (दिव्यज्योती हायस्कूल), अन्वयी पवार (व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कूल, बांदा) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. या गटात धनश्री नाईक (व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कूल, बांदा) व समृद्धी देसाई (माध्यमिक विद्यालय, डेगवे) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. आठवी ते दहावी गटात अस्मी मांजरेकर (आर. पी. डी. हायस्कूल, सावंतवाडी), नैतिक मोरजकर (खेमराज हायस्कूल, बांदा) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक, आराध्य तेली (व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कूल, बांदा) व ऐश्वर्या गावडे (माध्यमिक विद्यालय, इन्सुली) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. स्पर्धेचे परीक्षण अनंत भाटे यांनी केले. कार्यक्रमास सिद्धेश डेगवेकर, वाचनालयाचे संचालक मंडळ, शिक्षक, पालक, विद्यार्थी व वाचनालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com