स्वामी समर्थ मठाकडून
घारपी शाळेला मदत

स्वामी समर्थ मठाकडून घारपी शाळेला मदत

Published on

21090
घारपी ः मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांना आर्थिक मदत सुपूर्द करताना मान्यवर.

स्वामी समर्थ मठाकडून
घारपी शाळेला मदत
बांदा, ता. ३१ ः घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक, भौतिक व सर्वांगीण विकासासाठी घारपी येथील स्वामी समर्थ मठ यांच्या वतीने शाळेला रोख दहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत देण्यात आली.
शाळेसाठी ही मदत मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांच्याकठे मठाचे प्रमुख विजय गावकर, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ पालकी सोबत आलेले श्री. कुलकर्णी, स्वामीभक्त ज्ञानेश्वर सावंत, महेश‌ नाईक, शिवराम गावडे, संजय गावडे, अजित मयेकर, ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर, उपाध्यक्ष यशोदा गावडे, उपशिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली. मुख्याध्यापक पाटील यांनी स्वामी समर्थ मठाचे विशेष आभार मानले.
---
21089
शिरगाव ः येथील हायस्कूलच्या वर्गखोली नूतनीकरणासाठी देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

शिरगाव हायस्कूलला
दीड लाखांची मदत
देवगड, ता. ३१ ः तालुक्यातील शिरगाव हायस्कूलचे माजी विद्यार्थी सहदेव लोके यांनी आपली पत्नी सुगंधा लोके यांच्या स्मरणार्थ हायस्कूलच्या वर्गखोली नूतनीकरणासाठी १ लाख ५० हजारांची देणगी दिली. देणगीचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष अरुण कर्ले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम, उपाध्यक्ष गणपत तावडे, प्रकाश गोठणकर, मुख्याध्यापक शमसुदीन आत्तार आदी उपस्थित होते. श्री. कर्ले यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. लोके यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com