रत्नागिरी- वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉनचा प्रारंभ

रत्नागिरी- वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉनचा प्रारंभ
Published on

-rat३१p१२.jpg-
२६O२१०६३
नवी दिल्ली : केंद्रीय औद्योगिक सुरक्षादलातर्फे आयोजित ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन–२०२६’ या कोस्टल सायक्लोथॉनचा प्रारंभ झाला.
--------
‘वंदे मातरम् कोस्टल’ सायक्लोथॉनला हिरवा झेंडा
सीआयएसएफचे आयोजन; किनारपट्टी सुरक्षेबाबत जागरूकता, किनारी समुदायाशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : देशाच्या सागरीसुरक्षेबाबत जनजागृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षादलातर्फे (CISF) आयोजित ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन–२०२६’ या मोहिमेचा प्रारंभ नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम येथे झाला. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सायक्लोथॉनला हिरवा झेंडा दाखवला.
ही मोहीम २५ दिवस चालणार असून, सुमारे ६,५०० किलोमीटर अंतर पार करणार आहे. देशातील ९ किनारी राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे. सायक्लोथॉनद्वारे किनारपट्टी सुरक्षेबाबत जागरूकता वाढवणे, किनारी समुदायांशी संवाद मजबूत करणे आणि सागरी परिसंस्थेच्या संवर्धनाचा संदेश देणे हा प्रमुख उद्देश आहे. सायक्लोथॉनमध्ये मुंबई, गोवा, मंगळुरू, कोची, विशाखापट्टणम आणि चेन्नईसारख्या प्रमुख सागरी शहरांमध्ये क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सागरी जनजागृती उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.
मंत्री नित्यानंद राय म्हणाले, वंदे मातरम सायक्लोथॉन-२०२६ यावर्षी ऐतिहासिक आणि जनआंदोलनात परिवर्तित होणार आहे. या महान उपक्रमात सहभागी होऊन युवा भारतने स्वातंत्र्याला वंदन केले आणि आजही पिढ्यानपिढ्या राष्ट्रसेवेचा निश्चय कायम ठेवला आहे. किनारपट्टी सुरक्षेचे महत्त्व नागरिकांना विशेषतः किनारी समुदायांना सतत सहभागासाठी किनार सुरक्षा मजबूत करणे हे आहे.
या उपक्रमात युवक, विद्यार्थी, एनसीसी-एनएसएस स्वयंसेवक तसेच स्थानिक नागरिकांचा सहभाग असणार आहे. विविध किनारी शहरांमध्ये क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्वच्छता व पर्यावरण जनजागृती उपक्रम राबवले जाणार आहेत. हा उपक्रम केवळ क्रीडा कार्यक्रम नसून, राष्ट्रीय एकात्मता, सागरीसुरक्षा आणि नागरिक सहभाग यांना बळकटी देणारी व्यापक चळवळ आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.
----------
चौकट १
१४ला रत्नागिरीत येणार
२८ जानेवारी ते २२ फेब्रुवारीपर्यंत सायक्लोथॉन सुरू राहणार आहे. वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ही सायक्लोथॉन आयोजित केली आहे. याची सांगता कोची येथे २२ फेब्रुवारीला होईल. रत्नागिरी जिल्ह्यात अंजनवेल (ता. गुहागर) येथे १३ फेब्रुवारीला सायक्लोथॉन येईल. त्यानंतर १४ रोजी दुपारी रत्नागिरीच्या पोलिस संचलन मैदानावर सायक्लोथॉन पोहोचून छोटेखानी कार्यक्रम होईल. त्यानंतर पुढील मार्गावर रवाना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com