स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेवींनी
स्वामी स्वरूपानंद संस्थेच्या ४०० कोटी ठेवी
अॅड. दीपक पटवर्धन ः ठेववृद्धी मासात विक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेवींनी आज ४०० कोटींचा ठेव टप्पा ओलांडला. आज नववर्ष ठेव योजनेच्या अखेरच्या दिवशी ४०० कोटींच्या ठेवींची बिरूदावली संस्थेने साध्य केली. १ जानेवारी रोजी सुरू झालेल्या ठेव वृद्धिमासात संस्थेकडे ८ कोटी ५ लाखांच्या ठेवी ६३५ ठेव खात्यांच्या माध्यमातून नव्याने संकलित झाल्या. गेली ३४ वर्षे घेतलेल्या मेहनतीने आज मोठा टप्पा गाठल्याचा आनंद असल्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले.
गेली ३४ वर्ष ग्राहक सभासदांचा अतूट विश्वास आणि सहकार्याला पात्र ठरत स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने कमालीचे सातत्य राखत आपले अर्थकारण वाढवत नेले आहे. ४८ हजार ग्राहक सभासदांपर्यंत आपल्या १७ शाखांच्या माध्यमातून आपल्या सेवांचा विस्तार वाढवल्याचे त्यांनी सांगितले.
ठेववृद्धी मासाला चांगला प्रतिसाद मिळाला. काल ३९९ कोटी १३ लाखांपर्यंत मजल मारली होती. आज महिनाअखेरीच्या दिवशी दुपारी ४०० कोटींचा टप्पा पार झाला. आज ५२ ठेवीदारांनी आपल्या ठेवी पतसंस्थेत ४०० कोटींचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठीचे योगदान म्हणून गुंतवल्या. हा प्रतिसाद लक्षणीय आहे. चालू आर्थिक वर्षांत संस्था ५०० कोटींचा ठेव टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करणार आहे. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा संमिश्र व्यवसाय ६९३ कोटींच्या पुढे पोहोचला आहे. चालू आर्थिक वर्षात हा व्यवसाय ८०० कोटींची भरारी घेईल, असे अॅड. पटवर्धन म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

