तळेरे प्रशालेत ‘मराठी’चे धडे
21312
तळेरे प्रशालेत ‘मराठी’चे धडे
तळेरे, ता. १ : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कणकवली तालुका पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेले विषयतज्ज्ञ मार्गदर्शक, विशिष्ट विषय प्रशिक्षण कर्मचारी सचिन तांबे यांनी येथील वामनराव महाडिक हायस्कूलमध्ये एकदिवसीय विशेष उपक्रम राबविला. या उपक्रमात पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांना मराठी भाषेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत मराठी शब्दसंपदा वाढीसाठी म्हणी, वाक्प्रचार व कोडी यांसारखे विविध उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आपली भाषिक क्षमता सादर केली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षिका डी. सी. तळेकर, सहायक शिक्षक एस. सी. शेटये, एस. यू. सुर्वे, एस. एस. पडवळ आदी उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

