असलदेत पीरबाबा उर्से मुबारक उत्साहात

असलदेत पीरबाबा उर्से मुबारक उत्साहात

Published on

21314

असलदेत पीरबाबा उर्से मुबारक उत्साहात
नांदगाव ः असलदे येथे हजरत असलदे वल्ली युल्ला पीरबाबाचा उर्से मुबारक भाविकांच्या गर्दीत उत्साहात झाला. रात्री कव्वाली मुकाबला पाहण्यासाठी रसिकांची गर्दी उसळली. संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने उजळला होता. यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. दोन्ही गौसिया मस्जिद येथून पीरबाबाचा स॑दल निघाला. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांदगाव तिठा येथे रातीब खेळ रंगला. त्यानंतर पीरबाबाचा स॑दल बाबाच्या असलदे दर्गा शरीफ येथे चालत पोहोचला. रात्री उशिरापर्यंत नवस बोलणे व नवसफेड कार्यक्रम सुरू होता. शेरोशायरी, मराठी व हिंदी गझल, सिनेगीतांची झलक पेश करत दोन्ही कव्वालांनी उपस्थितांची मने जिंकली. सर्व भाविकांनी या उर्से मुबारक कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घेतला. नांदगाव उर्से कमिटीने आभार मानले.
---
21313
नुकसानग्रस्त मच्छिमारास मदतीचा हात
मालवण : तारकर्ली येथे होडी जळून नुकसान झालेल्या दाजी कुबल या मच्छिमारास आवारवाडी ग्रुपतर्फे जाळी भेट देऊन मदत करण्यात आली. यावेळी बबलू मोंडकर, भाऊ मोर्जे, विष्णू मालंडकर, पांडू मालंडकर, अक्षय मोर्जे, नीलेश मोंडकर, जॉन फर्नांडीस, बंटी परब, डेविड फर्नांडीस, राजेश हुले, इसेज डिसोझा, मंगेश कोयंडे, प्रवीण पराडकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com