फिनोलेक्सच्या विद्यार्थ्यांची विप्रो पारी ऑटोमेशन''ला भेट

फिनोलेक्सच्या विद्यार्थ्यांची विप्रो पारी ऑटोमेशन''ला भेट

Published on

- rat१p२०.jpg-
२६O२१३३१
सातारा ः येथील विप्रो पारी ऑटोमेशनला भेट देणारे फिनोलेक्स अॅकॅडमीचे विद्यार्थी.

‘फिनोलेक्स’ची ‘विप्रो ऑटोमेशन’ला भेट
आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव; विद्यार्थ्यांसाठी ठरली पर्वणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : येथील फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शिरवळ (जि. सातारा) येथील ‘विप्रो पारी ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड’ या अग्रगण्य औद्योगिक प्रकल्पात नुकतीच औद्योगिक भेट आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाद्वारे द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना उद्योगातील आधुनिक कार्यप्रणाली प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली.
महाविद्यालयाचा विद्युत विभाग सातत्याने उद्योगाभिमुख आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर देत असतो. त्याचाच एक भाग म्हणून सातारा एमआयडीसीमधील या प्रकल्पास ३५ विद्यार्थ्यांनी भेट दिली. प्रारंभी विप्रो पारीच्या एच.आर. विभागातर्फे करिअरच्या संधी आणि आवश्यक कौशल्यांबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. अत्याधुनिक यंत्रणेचे दर्शन विद्यार्थ्यांनी या वेळी पीएलसी व स्काडा आधारित असेंब्ली मशिन्स, पिक अँड प्लेस रोबोट्स, हायड्रॉलिक स्टोरेज सिस्टिम्स आणि ‘ऑटोमेटेड गाईडेड व्हेईकल्स’ यांसारख्या ‘इंडस्ट्री ४.०’ तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या भेटीचे समन्वय विप्रो पारीचे श्रीपाद शिंदे यांनी केले. सैद्धांतिक आणि प्रत्यक्ष अनुभवाची सांगड भेटीच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी अभिप्राय व्यक्त केले. या उपक्रमाचे आयोजन प्रा. निखिल कासार यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com