यशस्वी होण्यासाठी शिक्षण महत्वाचे
- rat१p२४.jpg-
२६O२१३६३
राजापूर : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष हुसनबानू खलीफे.
-----
यशासाठी शिक्षण महत्त्वाचे
हुस्नबानू खलिफे ः नवजीवन हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ ः आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षण हेच सर्वात महत्त्वाचे साधन आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षित होऊन आपल्या शिक्षणाचा लाभ सर्वांना करून द्यावा, असे प्रतिपादन नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे यांनी केले.
राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या १२ वीच्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरणावेळी त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर नगरसेवक अॅड. जमीर खलिफे, राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुलतान ठाकूर, सचिव मजीद पन्हळेकर, खजिनदार हनीफ काझी, सदस्या हसीना मुकरी, नगरसेविका अमिना गडकरी, शबाना मुल्ला, अफरोज झारी, शौकत काझी, मोहन पाडावे, प्राचार्य राजेंद्रकुमार व्हनमाने आदी उपस्थित होते.
याप्रसंगी खलिफे यांनी सतत शिकत राहण्याची आपली अभ्यासू वृत्ती आपणाला दिशादर्शक ठरली हे उदाहरणासह सांगितले. तसेच प्रशालेचे प्राचार्य राजेंद्रकुमार व्हनमाने यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षेबरोबरच आपल्या आयुष्यातील प्रश्न विचारपूर्वक सोडवण्यावर भर द्यावा व यश प्राप्तीनंतर नम्र राहून जीवनाला सामोरे जा, असे सांगितले.
या कार्यक्रमावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. त्यानंतर वर्षभरातील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी प्रतिनिधी सुरज धुमाळ, विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रांजल करंजवकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

