कुडाळ तहसीलमध्ये ईव्हीएम सिलिंग पूर्ण
21381
कुडाळ तहसीलमध्ये
ईव्हीएम सिलिंग पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकूण १५३ मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीन कमिशनिंगची (मतदान यंत्र सिलिंग) प्रक्रिया आज येथील तहसील कार्यालय येथे पूर्ण करण्यात आली. यासोबतच निवडणुकीसाठी राखीव स्वरुपात ७२ ईव्हीएम मशिन्स सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
तहसील कार्यालयात ईव्हीएम कमिशनिंग कामकाजाची पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे आणि उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांनी भेट देऊन आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील, नायब तहसीलदार संजय गवस, निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्यासह निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

