दुचाकी धडकेने सायकलस्वार मजुर जखमी

दुचाकी धडकेने सायकलस्वार मजुर जखमी

Published on

दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार जखमी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ ः शहरातील गजबजलेल्या बाजारपेठ परिसरात रविवारी दुपारी एका दुचाकीस्वाराने सायकलवरून जाणाऱ्या मजूर व्यक्तीस धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की दुचाकीचा दर्शनीभाग तुटून तब्बल १५ फूट लांब उडाला. अपघातानंतर दुचाकीस्वार धूम स्टाईलने पसार झाला.
अपघातग्रस्त मजुराच्या नाकातून व तोंडातून रक्तस्राव होत होता. व्यापारी अरुण भोजने व अन्य व्यापाऱ्यांनी तात्काळ त्याला उचलून बाजूला केले. यानंतर पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्यात आला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी मजुराला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून दुचाकीस्वाराची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com