राजापूर ग्रामीण रूग्णालयात पाच शस्त्रक्रिया
राजापूर ग्रामीण रुग्णालयात पाच शस्त्रक्रिया
अधीक्षक मेस्त्री ः महिन्यातून दोन वेळा शिबिर ; स्थानिक रुग्णांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ ः राजापूर ग्रामीण रुग्णालयात अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच यशस्वीपणे पाच शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या पाच रुग्णांपैकी चार लहान मुलांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्या आल्या आहेत. यापुढे महिन्यातून दोन वेळा अशा शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी दिली.
राजापूर ग्रामीण रुग्णालयात मागील काही वर्षात शस्त्रक्रिया होत नसल्याने लहानमोठ्या शस्त्रक्रियांसाठी तालुक्यातील रुग्णांना रत्नागिरी वा अन्य शासकीय तसेच खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे तालुक्यातील गोरगरीब जनतेला नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. मात्र शुक्रवारी राजापूर ग्रामीण रुग्णालयात आयोजित शस्त्रक्रिया शिबिरामध्ये एकूण पाच जनरल शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप आणि त्यांचे सहकारी सर्जन डॉ. गुरव आणि डॉ. घोसाळकर यांनी या शस्त्रक्रिया केल्या. भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. जमशेर यांनी काम पाहिले.
दरम्यान, राजापूर ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया नोंदणी आणि शारीरिक तपासणी दररोज सकाळच्या सत्रात सुरू राहणार आहे. तसेच आठवड्यातून दोन दिवस नियमितपणे सीझर शस्त्रक्रीयादेखील सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असून याकरिता रत्नागिरी येथील एक किंवा दोन भूलतज्ज्ञ राजापूर येथे पॅनेलवर घेण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचेही डॉ. मेस्त्री यांनी सांगितले.
----
चौकट
शस्त्रक्रिया होणार विनामूल्य
दर महिन्याला अशा प्रकारचे राजापूर ग्रामीण रुग्णालयात एक-दोन कॅम्प घेण्यात येणार आहेत. यामध्ये हर्नीया, हायड्रोसील, अपेंडीक्स, लहान मुलांचे लघवीवाटेच प्रॉब्लेम आणि इतर विनामूल्य जनरल शस्त्रक्रियांसाठी राजापूर तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. मेस्त्री यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

