मृत वीज कामगार अनिकेत परवडी यांच्या कुटुंबाला आधार

मृत वीज कामगार अनिकेत परवडी यांच्या कुटुंबाला आधार
Published on

वीज कामगार संघटनेचा माणुसकीचा हात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : महाराष्ट्र वीज कामगार संघ रत्नागिरी जिल्ह्याच्यावतीने मृत कामगार अनिकेत शांताराम परवडी यांच्या काल निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात आले. या दुःखद प्रसंगी संघटनेने केवळ मानसिक आधारच दिला नाहीतर सामाजिक बांधिलकी जपत तातडीची आर्थिक मदतही सुपूर्द केली.
परवडी यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर ओढवलेले संकट लक्षात घेता संघटनेच्या वेलफेअर फंडातून ११ हजार रुपयांचा धनादेश त्यांच्या वारसांकडे सुपूर्द करण्यात आला. ‘कामगारांच्या कठीण काळात आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबा वर येणाऱ्या आर्थिक व सामाजिक अडचणींच्या वेळी संघटना सदैव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही या वेळी पदाधिकाऱ्यांनी दिली.
या भेटीवेळी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जयेंद्र थुळ, उपाध्यक्ष धनंजय चव्हाण, जिल्हा सचिव अजित शिंदे, रत्नागिरी विभागीय कार्यालय अध्यक्ष विलीन काष्टे, संघटक दत्तप्रसाद खडपे, घनश्याम लिंगायत, जिल्हा कोषाध्यक्ष मंदार चव्हाण तसेच राजापूर तालुक्यातील कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र वीज कामगार संघ ही संघटना केवळ हक्कांसाठीच लढणारी संघटना नसून, आपल्या सदस्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना आधार देणारी एक सामाजिक शक्ती आहे, हे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. भविष्यातही कामगारांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील राहील, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com