

21511
हरकुळ बुद्रुक : येथील कार्यक्रमात सतीश सावंत यांनी पालकमंत्री नीतेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
राणेंमुळे लोकप्रतिनिधी बनल्याचे भान ठेवा
नीतेश राणे : सतीश सावंत अखेर भाजपमध्ये
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २ : ‘‘मी माझ्यामुळे निवडून येतो, असा गैरसमज कुठल्याही कार्यकर्त्याने अथवा लोकप्रतिनिधीने करू नये, तर नारायण राणेंचा आशीर्वाद आहे, म्हणूनच आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकतो, हा विचार सर्वांनी मनात ठेवावा,’’ असे प्रतिपादन पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले.
तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, ठाकरे शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात श्री. राणे बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, आनंद ठाकूर, चंद्रहास सावंत, दिलीप तळेकर आदी उपस्थित होते.
श्री. राणे म्हणाले, ‘‘नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न साडेचार लाख रुपयांपर्यंत नेण्याचा संकल्प गेला आहे. त्याअनुषंगाने आम्हाला शेती, सिंचन, सहकार क्षेत्रात मोठे काम उभे करायचे आहे. त्यासाठी सावंत यांच्या भाजपमध्ये येण्याचा, त्यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. शेती, सिंचन, सहकार क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या सावंत यांची किंमत ठाकरे शिवसेनेला कधीच कळली नाही. त्यांचे सरकार असताना शेती, सहकारातील योगदानाचा फायदा त्यांना करून घेता आला असता, पण ते झाले नाही. ते आता भाजपमध्ये आले आहेत. ते आता या प्रश्नांना नक्कीच न्याय देतील.’’
ते म्हणाले, ‘‘सध्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये भांडणे लावण्यासाठी अनेक टोळ्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये समज, गैरसमज होतात. काही वेळा दुरावा येतो. मात्र, पुन्हा सर्वजण एकत्र येतात, ही आनंदाची बाब आहे. यंदा खासदार राणे यांचा ७५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सिंधुदुर्गातील १९९० पासूनचे त्यांचे सोबती पुन्हा निश्चितपणे एकत्र येतील, असा विश्वास वाटतो.’’
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सावंत यांनी सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचे भाजपत स्वागत केले. आनंद ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले.
...............
‘...म्हणून घेतला निर्णय’
श्री. सावंत म्हणाले, ‘‘राणेंमुळे २००२ ते २०१२ पर्यंत जिल्हा परिषदेवर निवडून आलो. जिल्हा परिषद अध्यक्ष ते जिल्हा बँक अध्यक्षपर्यंत सर्व पदांवर काम करण्याची संधी मिळाली. मात्र, २०१९ मध्ये गैरसमजातून राणेंची साथ सोडली. गेल्या सहा वर्षांत विकासाची कामे करू शकलो नाही, ही खंत वाटत होती. इथला जनादेश भाजपच्या बाजूने आहे. जनादेशाचा अनादर कुणालाच करता येत नाही. त्यामुळे भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.