आंबोलीतील ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिंदे शिवसेनेमध्ये
21512
आंबोलीतील ठाकरे गटाचे
कार्यकर्ते शिंदे शिवसेनेमध्ये
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः आंबोली जिल्हा परिषद गटात ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उपविभाग प्रमुख बुधाजी पाताडे, ग्रामपंचायत सदस्य महेश पावसकर आणि निधी गुरव यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पक्ष निरीक्षक राजेश मोरे यांच्या हस्ते या सर्व कार्यकर्त्यांनी हातात भगवा झेंडा घेतला.
प्रवेश केलेल्यांमध्ये राजा गुरव, रामचंद्र आमडोस्कर, निखिल गुरव, जीजी राऊत, गोविंद जाधव, संजय राऊत, सुनील राऊत, शोभना राऊत आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी पक्ष निरीक्षक राजेश मोरे, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, पंचायत समिती उमेदवार मायकल डिसोजा, विभाग प्रमुख विलास गावडे, माजी सरपंच जगन्नाथ गावडे, अरुण गावडे, नंदू गावडे, विशाल बांदेकर, उत्तम नार्वेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. आगामी निवडणुकांच्या तोंडावर आंबोलीत शिवसेनेने आपली पकड अधिक मजबूत केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

