संगमेश्वर-संतोष चव्हाण यांचा दुसरा क्रमांक

संगमेश्वर-संतोष चव्हाण यांचा दुसरा क्रमांक

Published on

rat2p11.jpg-
26O21506
नागपूर ः राज्य विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत द्वितीय क्रमांकप्राप्त संतोष चव्हाण यांचा गौरव करण्यात आला.

विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत
संतोष चव्हाण द्वितीय
संगमेश्वर, ता. २ ः केंद्रप्रमुख पदाची अतिरिक्त जबाबदारी, शाळेचे मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले जिल्हा परिषद पिरंदवणे नं. १ शाळेचे उपक्रमशील शिक्षक संतोष चव्हाण यांनी नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. कोळंबे (ता. संगमेश्वर) येथील चव्हाण गुरुजींना शैक्षणिक साहित्यनिर्मितीची आवड अगदी सुरुवातीपासून होती. गणित अध्यापनात वैविध्य आणताना त्यात नावीन्यपूर्ण साहित्यनिर्मिती करून त्यांनी जिल्हास्तरीय प्रदर्शनात प्रथम पारितोषिक पटकावले होते. त्यांच्या या यशामुळे संगमेश्वर तालुका व रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राला झळाळी प्राप्त झाली असल्याचे सहकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com