कणकवलीत महिला विक्रेत्‍याचा
पैशाचा डबा चोरट्याने पळविला

कणकवलीत महिला विक्रेत्‍याचा पैशाचा डबा चोरट्याने पळविला

Published on

कणकवलीत महिला विक्रेत्‍याचा
पैशाचा डबा चोरट्याने पळविला

चाळीस हजार रुपये, कागदपत्रे चोरीस

कणकवली, ता. २ : शहरातील उड्डाणपुलाखाली कांदे, बटाटे, केळीचा विक्री व्यवसाय करणाऱ्या महिला विक्रेत्‍याकडील पैशाचा डबा अज्ञाताने पळविला. यात रोख ४० हजार रुपये, गाडीची चावी आणि पावत्या होत्या. याबाबत त्‍या महिलेने कणकवली पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरीची फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानवली गावठाणवाडी येथील नेत्रा विश्राम तेली या शहरातील उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत कांदा, बटाटे आणि केळी विक्रीचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता त्‍या प्लास्टिकच्या डब्‍यामध्ये रोख ४० हजार रुपये आणि साहित्‍याची बिले घेऊन आल्‍या होत्या. दुपारी एकच्या सुमारास एका ग्राहकाने केळी विकत घेतली. त्‍या विक्रेत्‍याला दुकानाबाहेर येऊन केळी दिली. त्‍यानंतर नेत्रा या पुन्हा आपल्‍या जाग्यावर गेल्या असता, त्‍यांना रोख रक्‍कम ठेवलेला डबा दिसून आला नाही. त्‍यांनी आजूबाजूला शोध घेऊनही डबा सापडला नाही. त्‍यामुळे अज्ञाताने रोख रक्‍कम असलेला डबा चोरून नेल्‍याची फिर्याद त्‍यांनी पोलिस ठाण्यात दिली. त्‍यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास हवालदार विनोद चव्हाण करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com