भरधाव मोटारीच्या धडकेत पिंगुळीतील महिलेचा मृत्यू

भरधाव मोटारीच्या धडकेत
पिंगुळीतील महिलेचा मृत्यू
Published on

21656

भरधाव मोटारीच्या धडकेत
पिंगुळीतील महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारीने धडक दिल्याने पादचारी महिला जागीच ठार झाली. आशा सोनू धुरी (वय ६५, रा. पिंगुळी-धुरीटेंबनगर) असे तिचे नाव आहे. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास पिंगुळी-मोरजकरवाडी येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, की मुंबईहून दोडामार्ग-सावंतवाडीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या मोटारीने (एमएच ५८-०१८९) पादचारी आशा धुरी यांना जोरदार धडक दिली. धुरी या आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे सकाळी घरकामासाठी पायी जात असताना हा अपघात घडला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मोटारीचा वेग इतका होता, की धडक दिल्यानंतर मोटार ३५ ते ४० मीटर अंतरावर जाऊन थांबली. अपघातात मोटारीचेही मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच पिंगुळी-धुरीटेंबनगर व मोरजकरवाडी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. कुडाळ पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी संबंधित मोटारचालकाला ताब्यात घेतले असून येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com