''हरित सेना अतिउत्कृष्ट शाळा'' पुरस्काराने पाट प्रशाळेचा गौरव
swt31.jpg
21760
सिंधुदुर्गनगरीः पाट विद्यालयास ‘हरित सेना अतिउत्कृष्ट शाळा’ पुरस्काराने गौरविताना मान्यवर.
‘हरित सेना अतिउत्कृष्ट शाळा’
पुरस्काराने पाट प्रशाळेचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ३ ः हरित सेना अतिउत्कृष्ट शाळा म्हणून पाट येथील एस. एल. देसाई विद्यालयाला वनाधिकारी राजेंद्र मगदूम यांनी सिंधुदुर्गनगरी येथे सन्मानपत्र प्रदान केले. हरित सेना प्रमुख संदीप साळसकर यांनी हे सन्मानपत्र स्वीकारले. पाट विद्यालयात सर्वच उपक्रम नावीन्यपूर्ण राबविले जातात. हरित सेनेमार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये पक्षी निरीक्षण, वृक्ष लागवड, ‘एक पेड मॉ के नाम’, कांदळवन सफारी, विविध वन दिन साजरे करून मुलांमध्ये पर्यावरण जागृती केली जाते.
जिल्हा सामाजिक वनीकरण विभागामार्फत विविध मार्गदर्शन शिबिरे घेतली जातात. विद्यालयामध्ये पाणथळ क्लब, इको क्लब, वनरक्षक क्लब असे विविध गट स्थापन करून त्यामार्फत कार्य केले जाते. परसबाग लागवड, वनौषधींची ओळख, रानभाजी मेळावा असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. याची दखल घेऊन शाळेला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सहाय्यक वनरक्षक वर्षा कोळेकर, वनक्षेत्रपाल लक्ष्मण पोद्दार, वनपाल श्रेया परब आदी उपस्थित होते. सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर यांनी साळसकर व या उपक्रमातील सर्व सहभागी शिक्षक, विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

