

-rat३p८.jpg-
२६O२१७७५
सावर्डे : अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे पूजन व दर्शन घेताना आमदार शेखर निकम.
------
अजित पवार यांच्या अस्थींचे
गुहागर समुद्रात विसर्जन
सावर्डे, ता. ३ : अजित पवार यांच्या अस्थींचे गुहागर समुद्रकिनारी धार्मिक विधी, पूजन व मंत्रोच्चारानंतर अरबी समुद्राच्या पवित्र जलात विधिवत विसर्जन करण्यात आले.
अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा अस्थिकलश २ फेब्रुवारीला रत्नागिरी जिल्ह्यात आणण्यात आला होता. सावर्डे येथील आमदार शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. त्याचे दर्शन विविध भागांतून हजारो नागरिक, कार्यकर्त्यांनी घेतले. दर्शनानंतर अस्थिकलश गुहागर येथे नेण्यात आला. गुहागर समुद्रकिनारी धार्मिक विधी, पूजन व मंत्रोच्चारानंतर समुद्रात त्याचे विसर्जन करण्यात आले. या वेळी आमदार शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयंत जालगावकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.