खेडमध्ये भाजप-राष्ट्रवादी-आरपीआयची महायुती
भाजप-राष्ट्रवादी-आरपीआयची
खेड तालुक्यामध्ये महायुती
ऋषिकेश मोरेः आरपीआय संघटनात्मक ताकद दाखवणार
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३ : भाजपचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी खेड तालुक्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) यांची महायुती अधिकृतपणे जाहीर केली. उशीर झाला असला तरी थेट आणि स्पष्ट निर्णय घेण्यात आला असून, या महायुतीच्या माध्यमातून मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. या निवडणुकीत आरपीआय आपली संघटनात्मक ताकद दाखवणार असल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दापोली विधानसभा संपर्कप्रमुख स. तु. कदम यांनी महायुतीला पूर्ण पाठिंबा दर्शवताना उमेदवारी प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे आरपीआयला सध्याच्या निवडणुकीत जागा देता आल्या नसल्याची कबुली दिली; मात्र, यापुढील सर्व निवडणुका आरपीआयला सोबत घेऊनच महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जातील, अशी ग्वाही दिली.
या वेळी आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष गौतम तांबे, कोकण युवक प्रदेशाध्यक्ष सुशांत सकपाळ यांच्यासह आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

