अणावमध्ये ‘न्याय आपल्या दारी’

अणावमध्ये ‘न्याय आपल्या दारी’

Published on

21874

अणावमध्ये ‘न्याय आपल्या दारी’

मोबाईल लोकअदालत; ८० हजारांची वसुली

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३ ः जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गमार्फत ‘न्याय आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत आज अणाव, डिगस येथे मोबाईल व्हॅनद्वारे कायदेविषयक शिबिर आणि लोकअदालत उत्साहात झाली. या मोबाईल व्हॅन लोकअदालतीत ३३ प्रकरणे ठेवण्यात आलेली होती.
पैकी १ प्रकरण निकाली होऊन रक्कम ८० हजारांची वसुली करण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत २ ते २८ फेब्रुवारी या कालावधीमध्ये मोबाईल लोकअदालत व फिरते विधी सेवा केंद्र या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात मोबाईल व्हॅनद्वारे कायदेविषयक शिबिरे व मोबाईल लोकअदालत घेण्यात येत आहे. मोबाईल व्हॅनचे उद्‍घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. त्यावेळी एस. एस. इंदलकर (जिल्हा न्यायाधीश), ए. ए. चेंडके (दिवाणी न्यायाधीश), ए. जी. देशिंगकर (सह दिवाणी न्यायाधीश), एस. जे. पाटील (सह दिवाणी न्यायाधीश), जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव एस. डी. गुंडेवाडी तसेच न्यायालयीन कर्मवारी उपस्थित होते. शिबिरामध्ये मुख्य लोक अभिरक्षक ॲड. आर. एच. वागज, तसेच ॲड. एस. एस. खुने (सहाय्यक लोक अभिरक्षक) यांनी मार्गदर्शन केले. मोबाईल व्हॅन लोकअदालत आज अणाव ग्रामपंचायत येथे घेण्यात आली. यासाठी श्री. चेंडके, निकिता हरकुळकर यांनी पॅनेल सदस्य म्हणून काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com