मला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न हाणून पाडीन

मला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न हाणून पाडीन

Published on

ratchl३२..jpg ः
२६O२१८८२
चिपळूण ः सभेत बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम.
----
विरोधकांचा प्रयत्न हाणून पाडीन
योगेश कदम ः विरोधक एकत्र, तरीही मीच वरचढ
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः दापोली मतदारसंघात सर्व विरोधकांनी एकत्र येऊन मला घेरण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मी सर्वांना पुरून उरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी चिपळुणातील जाहीर सभेत दिला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती झाली; मात्र चिपळूण विधानसभा मतदारसंघात संगमेश्वरमध्ये महायुती झाली; मात्र चिपळुणात झालेली नाही. दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने स्वबळाचा नारा देत निवडणुकीला सामोरे जात आहे. चिपळुणात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभा घेतली. सभेत बोलताना गृहराज्यमंत्री कदम म्हणाले, ‘खेड पालिकेच्या निवडणुकीत विरोधकांना भोपळादेखील फोडता आला नाही. काही कारणाने येथे युती झाली नाही. या निवडणुकीत मला चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. चिपळुणातील सभा ही महायुतीची असल्याने जास्त बोलणार नाही; मात्र मी सर्वांना पुरून उरेन हे विरोधकांनी लक्षात ठेवावं, असा इशारा दिला. त्यांच्या या भाषणावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र स्मितहास्य करत अधिक बोलण्याचे टाळले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com