रत्नागिरी नफ्याचे अमिष दाखवून ३६ लाखांची फसवणूक
व्यवसायिकाची ३६ लाखांची फसवणूक
‘क्रिप्टो’तून जादा नफ्याचे अमिष; एमआयडीसी परिसरातील प्रकार, महिलेसह दोघांवर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतील एका व्यावसायिकाला ३६ लाख ६४ हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरजोळे एमआयडीसी परिसरातील फॅब्रिकेटर्स दुकान मालकाची ‘क्रिप्टो करन्सी’ ट्रेडिंगच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली आहे. सुहानी शर्मा (रा. कलकत्ता) व डॅनियल (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही.) असे संशयित आहेत. ही घटना २२ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दुपारी एकच्या सुमारास मिरजोळे एमआयडीसी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची फेसबुकवर सुहानी शर्मा नावाच्या एका महिलेशी ओळख झाली होती. सुहानीने त्यांचा विश्वास संपादन केला आणि तिचा मित्र डॅनियल हा कंपनीचा वरिष्ठ व्यवस्थापक असल्याचे सांगितले. डॅनियलने फिर्यादींना व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवून ते ॲप लॉगिन करण्यास भाग पाडले. संशयितांनी फिर्यादींना युएसडीटी ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. फिर्यादींचा विश्वास जिंकून त्यांना वेळोवेळी पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. त्यांनी ३६ लाख ६४ हजार ७४० रुपये गुंतवल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता.२) फिर्याद दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
---
चौकट
पोलिसांचे आवाहन
अनोळखी व्यक्तींनी सोशल मीडियावर दिलेल्या गुंतवणुकीच्या अमिषाला बळी पडू नका. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका किंवा अनोळखी ॲपमध्ये पैसे गुंतवू नका. फसवणूक झाल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन नंबर १९३०वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

