एसटी-दुचाकीच्या अपघातात दोघे जखमी

एसटी-दुचाकीच्या अपघातात दोघे जखमी

Published on

एसटी-दुचाकीच्या
अपघातात दोघे जखमी
रत्नागिरी ः हातखंबा ते रत्नागिरी मार्गावरील खेडशी येथील चाँदसूर्या उतारात एका दुचाकीने एसटी बसला धडक दिली. या अपघातात स्वारासह मागे बसलेला तरुण दोघेही जखमी झाले आहेत. हा अपघात २८ जानेवारीला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चाँदसूर्या उतारात झाला होता. एसटी चालक शांतीनाथ यशवंत हसबे हे एसटी घेऊन हातखंबाकडून रत्नागिरीच्या दिशेने डाव्या बाजूने जात होते. चाँदसूर्या खेडशी येथील उतारात डफळचोळवाडी फाट्यावरून दुचाकी घेऊन येणारे दिलीप सखाराम आंबेकर यांनी एसटीच्या उजव्या बाजूला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार आणि त्यांच्यामागे बसलेले रंजन महादेव खापरे हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले.​या अपघातात स्वार दिलीप आंबेकर आणि रंजन खापरे या दोघांनाही गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल बाजीराव नारायण कदम यांनी तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी स्वार दिलीप आंबेकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
------------
सांडेलावगण येथील
तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी ः तालुक्यातील सांडेलावगड-वाकणवाडी येथील दिव्यांग तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोष यशवंत पवार (वय ३६, रा. सांडेलावगण, वाकणवाडी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १) सायंकाळी साडेसातच्या सुमारास निदर्शनास आली. रविवारी त्यांचा भाऊ राकेश शेजारी असलेल्या देवघरातील दिवे लावण्यासाठी गेले असता त्यांना संतोष हा खोलीमध्ये गळफास घेतल्या स्थितीत दिसून आला. तत्काळ त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com