सोशल मीडियाद्वारे डिजिटल प्रचारावर भर

सोशल मीडियाद्वारे डिजिटल प्रचारावर भर

Published on

चिपळुणात डिजिटल प्रचारावर भर
समाजमाध्यमातून,आरोप-प्रत्योरापाच्या फैरी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ : रत्नागिरी जिल्हा परिषद आणि चिपळूण पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा घरोघरी भेटी देण्यावर भर असला तरी समाजमाध्यमांचा वापर अधिक प्रभावीपणे होत आहे. व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून रॅली, प्रचार दौरे आणि विकासकामांचा डिजिटल प्रचार करून मतदारांना साकडे घातले जात आहे.
चिपळूण तालुक्यात ९ गटात २३ उमेदवार आणि चिपळूण पंचायत समितीसाठी १८ गणात ४० उमेदवार रिंगणात आहेत. शनिवारी मतदान होत असल्याने प्रचारासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. सर्व मतदारांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचणे अशक्य असल्याने उमेदवारांनी डिजिटल बॅनर, व्हिडिओंचा आधार घेतला आहे. केलेली कामे, राबवलेल्या योजना आणि भविष्यातील अजेंडा फेसबुक, इन्स्टाग्रामवर झळकत आहे तर दुसरीकडे विरोधकांच्या उणिवा आणि कारभारावर समाजमाध्यमांतून टीकास्त्र सोडत आहेत. समाजमाध्यमावर सर्वत्र निवडणुकीचे वातावरण बघायला मिळत आहे. यावर निवडणुकांची चर्चा रंगत आहे. कोणत्या उमेदवाराचे पारडे जड आणि कमी आहे, कोण किती मते घेणार, कोणी किती विकासकामे केली, याचे विश्लेषण सुरू आहे.
------
मतदारांशी संपर्क
परगावी कामानिमित्त गेलेले मतदार निवडणुकीत निर्णायक ठरतात. या मतदारांच्या सातत्याने संपर्कात राहण्यासाठी समाजमाध्यम हे उत्तम साधन ठरले आहे. त्यांना शुभेच्छा संदेश पाठवणे आणि गावाची ओढ निर्माण करून मतदानासाठी बोलावणे यावर उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे.
--------
कोट
गावखेड्यात इंटरनेट सुविधा पोहोचल्याने स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपला अजेंडा प्रभावीपणे मांडण्यासाठी सामाजिक माध्यमांचा वापर खुबीने केला जात आहे.

- मुराद अडरेकर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com