''प्रतिषिद्ध'' नाटक : सामाजिक वास्तव आणि संघर्षाची गाथा
rat५p७.jpg-
२६O२२२४५
रत्नागिरी- राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत लोकहितवादी मंडळ, नाशिक या संस्थेने केलेल्या ‘प्रतिषिद्ध’ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ, सकाळ छायाचित्रसेवा)
राज्य नाट्यस्पर्धा ----------लोगो
‘प्रतिषिद्ध’ नाटक : सामाजिक वास्तव अन् संघर्षाची गाथा
लोकहितवादी मंडळाचे सादरीकरण; अभिनय, रंगभूषा, नेपथ्याला रसिकांची दाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः नालसा २०१४ कायद्यांतर्गत तृतीयपंथींना कायदेशीर मान्यता देण्याचे, सामाजिक कल्याणकारी लाभ देण्याचे आणि भेदभाव दूर करण्याचे निर्देश देण्यात आले होते या कायद्याचा तृतीयपंथींवर व समाजावर किती प्रभाव पडला, त्याच्या समस्या, सुविधा, महाविद्यालय, व्यवसाय, नोकऱ्या यावर भाष्य करणारे नाटक -प्रतिषिद्ध लोकहितवादी मंडळ-नाशिक या संस्थेने राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत सादर केले. डॉ. तन्मय भोळे लिखित व दिग्दर्शक-मुकेश काळे यांच्या संकल्पनेत तयार झालेल्या या नाटकाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. नालसा कायद्याचे अभ्यासपूर्ण भाष्य तसेच समाजाने नाकारलेले, टाकलेल्या तृतीयपंथींच्या भावना, समस्या कलाकारांनी अभिनयातून रेखाटल्या.
------
समाजात आजही तृतीयपंथीयांना हक्काचे स्थान मिळालेले नाही. शासनाने कायदे केले; परंतु त्यांची प्रभावी अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. याच ज्वलंत विषयावर भाष्य करणारे ‘प्रतिषिद्ध’ हे नाटक समाजाच्या डोळ्यात अंजन घालते. या नाटकाची कथा कबीर कोटनीस या प्रसिद्ध पत्रकाराभोवती फिरते. लहानपणी कबीरचा जीवलग मित्र प्रकाश याला काही लोक बळजबरीने तृतीयपंथीयांच्या पाड्यात घेऊन जातात. ही घटना कबीरच्या मनावर खोलवर जखम करून जाते. यामुळे कबीरच्या मनात तृतीयपंथियांबद्दल प्रचंड राग आणि तिरस्कार निर्माण होतो. तो त्यांना ‘समाजाला लागलेली कीड’ किंवा ‘नपुंसक’ अशा हीन शब्दांत संबोधतो. कबीर आज एक मोठा पत्रकार आहे. तो ‘नालसा’ कायद्याचा अभ्यास करतो; पण प्रकाशच्या आठवणींमुळे तो नेहमी अस्वस्थ असतो. तृतीयपंथीयांच्या पाड्यात केवळ अशिक्षित लोक नसून, तिथे सीए, वकील आणि एमएस्सी झालेले उच्चशिक्षित तरुण-तरुणी आहेत; मात्र, समाजात नोकरी मिळवण्यासाठी गेलेल्या या सुशिक्षितांच्या नशिबी केवळ अपमान आणि अत्याचार येतात. आरक्षणाची मागणी आणि समान हक्कांच्या अंमलबजावणीसाठी हे तृतीयपंथी आंदोलन करतात, जिथे त्यांना पोलिसांच्या मारहाणीला सामोरे जावे लागते.
एका महत्त्वाच्या प्रसंगी कबीरला तृतीयपंथीयांकडून ओलीस धरले जाते. तिथे त्याची भेट स्त्रीरूपात वावरणाऱ्या ‘प्रकाश’शी होते. सुरुवातीला कबीर त्याला स्वीकारत नाही; पण जेव्हा पाड्यातील इतर सुशिक्षित तृतीयपंथी कबीरला आपली कैफियत मांडतात तेव्हा त्याचे डोळे उघडतात. ‘आम्ही समाजाचाच एक भाग आहोत; पण समाजाने आम्हाला नाकारून ‘प्रतिषिद्ध’ (वर्ज्य) ठरवले आहे,’ हे त्यांचे बोलणे कबीरच्या मनाला भिडते. कोणालाही त्यांच्या इच्छेविरूद्ध पळवून नेणे चुकीचे आहे, हा मुद्दाही तिथे स्पष्ट होतो. अखेर कबीरला आपल्या चुकीची जाणीव होते. तो तृतीयपंथीयांची माफी मागतो आणि त्याच्या मनातील द्वेषाचा अंत होतो. लहानपणीचा मित्र प्रकाश आणि आजचा त्याचा स्त्री अवतार यांच्या भेटीने नाटकाचा भावनिक शेवट होतो.
-------
सूत्रधार आणि साहाय्य
लेखक ः डॉ. तन्मय भोळे, दिग्दर्शन ः मुकेश काळे, नेपथ्य ः आदित्य समेळ, नेपथ्य निर्मिती ः मुक्ता शेपाळ, सई उपासनी, संहिता देशपांडे, युगा कुलकर्णी, ध्रुव शाह, अक्षता देवरे, आनंद कुलकर्णी. प्रकाशयोजना व गीत ः सागर पाटील, पार्श्वसंगीत ः प्रथमेश पाडवी, अमेय जोशी, संगीत संयोजन ः सर्वेश साबळे. वेशभूषा ः अपूर्वा शौचे, रंगभूषा ः माणिक कानडे, नृत्य दिग्दर्शन ः रोहिणी जोशी, निर्मितीप्रमुख ः सुभाषा पाटील, किरण समेळ, रंगमंच सहाय्य ः लोकहितवादी मंडळ, नाशिक.
-----
पात्र परिचय
लहान कबीर ः विप्लव देशमुख, प्रकाश ः आदित्य कटारे, कबीर ः सागर संत, प्रज्ञा ः रोहिणी जोशी, अनघा ः वेदिका जांभोरे, मिनाक्षी ः ईशान घोलप, मूनमून ः तेजस मोहिते, आर्या ः देवगंधा भागवत, लक्ष्मी ः डॉ. सायली आचार्य, रमा ः ऋषिकेश पाटील, सुनंदा ः अक्षता देवरे, अॅना ः अथर्व सूर्यवंशी, इसाबेला ः युगा कुलकर्णी. आयेशा ः ध्रुव शाह, पुष्पाः अर्जून भावसार, वल्लरी ः संहिता देशपांडे, देशमुख ः डॉ. सम्राट देशमुख. मिस कालेलकर ः मानसी भावसार, पोलिस ः आदित्य समेळ. वेटर ः मानस पाटील. नृत्य कलावंत ः संदीप पाचांगे, सई उपासनी.
-------
आजचे नाटक
नाटक ः निर्वासित, सादरकर्ते ः मोरया प्रतिष्ठान, मुंबई. वेळ ः सकाळी ११.३० वा. नाटक ः कर्ण, सादरकर्ते ः नटराज नाट्य कला नाट्यमंडळ, बारामती. स्थळ ः स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह. वेळ ः सायंकाळी ७.३० वा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

