वालावलकरमध्ये १२ ला शिबिर

वालावलकरमध्ये १२ ला शिबिर

Published on

‘वालावलकर’मध्ये
१२ला शस्त्रक्रिया शिबिर
सावर्डे ः चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात मोफत महाशस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर १२ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या शिबिराचा लाभ घेता येणार आहे. त्यात हर्निया, अॅपेंडिक्स, मूळव्याध, हायड्रोसिल, चरबीच्या गाठी, थायरॉईड, फिशर मुतखडा, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट ग्रंथी, टॉन्सिल, कानाच्या पडद्याचे ऑपरेशन, नाकाचे हाड वाढणे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया या व्याधींवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. त्यासाठी रुग्णाचे पिवळे व केशरी रेशनकार्ड आणि आधारकार्ड गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी रुग्णालयातील सचिन धुमाळ, संकेत जांभळे व संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधावा.

डोळे तपासणी शिबिराचा
१०० विद्यार्थ्यांना लाभ
रत्नागिरी ः उत्कर्ष सेवाभावी संस्था आणि इन्फिगो आयकेअर यांच्या सौजन्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात रत्नागिरीतील १०० विद्यार्थांची तपासणी करण्यात आली. या उपक्रमाचे उद्‍घाटन ३ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी शहरातील झाडगाव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे झाले. या वेळी रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, नगरसेविका वर्षा ढेकणे, नगरसेविका सुप्रिया रसाळ, नगरसेवक संदीप सुर्वे, शहराध्यक्ष दादा ढेकणे, विश्वस्त गणेश सलीम, सामाजिक कार्यकर्ते संदीप रसाळ, इन्फिगो आयकेअरचे शाखा व्यवस्थापक सुशांत पांचाळ, मार्केटिंग हेड मंगेश पावस्कर व शाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

कामगारांना शनिवारी
भरपगारी सुटी
रत्नागिरी ः जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका राज्यात जाहीर झाल्या आहेत. मतदानाच्या दिवशी ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी सुटी द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्समध्ये काम करणाऱ्या कामगार मतदारांना व निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीचा हक्क बजावण्यासाठी ही सुटी देण्यात आली आहे. लोकोपयोगी सेवेत असलेल्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत देण्यात आली आहे. निवडणुकीशी निगडित वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com