सर्वसामान्यांसाठी लढणारे ठाकरे सेनेचे उमेदवार

सर्वसामान्यांसाठी लढणारे ठाकरे सेनेचे उमेदवार

Published on

आवाज उठवणाऱ्यांना साथ द्या
भास्कर जाधव ः खेर्डी गणात ठाकरे शिवसेनेची प्रचार सभा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ ः सर्वसामान्यांसाठी लढणारे आणि झगडणारे उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवत आहेत. सातत्याने जनतेसाठी आवाज उठवणाऱ्या ठाकरे सेनेच्या उमेदवारांना साथ द्यावी, असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी खेर्डी येथील बैठकीत केले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेर्डी गणात आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी माजी सरपंच धाकटू खताते यांनी आमदार जाधव यांनी १९९५च्या सुमारास आमदारकीच्या कालावधीत केलेल्या विकासकामांचा आढावा सादर केला. पाणी योजना, रस्ते यांसह विविध कामे त्यांनी मार्गी लावली; मात्र गेल्या १५ वर्षाच्या कालावधीत अपेक्षित विकास झाला नसल्याचे नमूद केले. उमेश खताते म्हणाले, या निवडणुकीत विरोधक सुरुवातीला मला गणतीत पकडत नव्हते; मात्र लोकांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे आता त्यांना धास्ती वाटू लागली आहे. विरोधकांकडून केवळ विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत. गेल्या १० वर्षापासून कचरा प्रकल्प बंद आहे. कचरा गोळा करून तो नदीकिनारीच गाडला जातो. या प्रसंगी आमदार जाधव म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून, विरोधकांकडून मतदारांना मोठमोठी आमिषे दाखवली जात आहेत. नागरिकांनी ठाकरे सेनेच्या सामान्य उमेदवारांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन केले. या सभेला उमेश खताते, स्वरा जावळे, माजी उपसरपंच बाबू शिर्के, मुंबईतील माजी नगरसेवक भोसले, सुबोध सावंत देसाई यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com