-११ फेब्रुवारीला क्रांती जनमोर्चा
Rat५p१२.jpg ः
२६O२२२५४
मंडणगड: मंडणगड पोलिस ठाण्यात मोर्चाबाबतचे निवेदन सादर करताना अॅड. यश घोसाळकर व अन्य मान्यवर.
मंडणगडमध्ये बुधवारी क्रांती जनमोर्चा
बालिकेवरील अत्याचार प्रकरण; प्रशासनाला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ५ ः दोन वर्षांच्या बालिकेवरील अमानुष अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ ११ फेब्रुवारी रोजी मंडणगड येथे क्रांती जनमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी समाज मंडणगड, व्यापारी संघटना आणि यशतेज फाउंडेशन यांच्यावतीने या संदर्भात प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जिल्ह्यात घडलेल्या या अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून, ही घटना केवळ संबंधित कुटुंबावर झालेला अन्याय नसून, समाजाच्या सुरक्षिततेवर झालेला घाला असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर ११ रोजी सकाळी १० वा. तहसील कार्यालय भिंगळोली येथे शांततामय व कायदेशीर मार्गाने जनमोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी महिला व बालसुरक्षासंदर्भात प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर प्रमोद काटकर, रघुनाथ जाधव आणि अॅड. यश घोसाळकर यांच्या सह्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

