- निधन
- rat५p१९.jpg-
P२६O२२३२४
बी. के. गोंडाळ
बी. के. गोंडाळ यांचे निधन
राजापूर, ता. ५ ः राजापूर शीळ येथील रहिवासी व जुवाठी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक भानू केरू उर्फ बी. के. गोंडाळ (वय ५३) यांचे निधन झाले.
गोंडाळ यांनी प्रारंभी ते गोठणदोनिवडे हायस्कूलवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते जुवाठी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. जुवाठी हायस्कूलमधील एक उपक्रमशील व विद्यार्थिप्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख होती. तालुका ग्रंथालय चळवळीतील ते अग्रणी कार्यकर्ते होते. त्यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कारही मिळाला होता. शीळ गावात त्यांनी १९९७ला ज्ञानसागर नावाने वाचनालय सुरू केले. आपल्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाचनालये सुरू करून वाचनसंस्कृती जपण्यासाठी भूमिका बजावली होती. राष्ट्रसेवा दलाचेही ते सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, बहिणी, पुतण्या असा मोठा परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

