मतदान करूया, लोकशाही बळकट करूया

मतदान करूया, लोकशाही बळकट करूया

Published on

swt518.jpg
22332
घारपी ः विद्यार्थ्यांनी सायकल फेरी काढून मतदानाबाबत जागृती केली. यावेळी शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

मतदान करूया, लोकशाही बळकट करूया
घारपीत जनजागृती ः विद्यार्थ्यांच्या सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ ः पंचायत समिती व जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपीच्या वतीने स्काऊट गाईड व कब बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून सायकल रॅलीद्वारे व्यापक मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले.
या अभियानाची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून करण्यात आली. मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांच्या हस्ते सायकल रॅलीला उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी स्वीप नोडल अधिकारी प्राची पाटील व स्वीप सहाय्यक नोडल अधिकारी तुकाराम मोरजकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी ''माझे मत-माझा अधिकार'', ''लोकशाही बळकट करूया, मतदान करूया'', ''लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, ७ फेब्रुवारी लक्षात ठेवा'' अशा घोषणांचे फलक हातात घेतले होते.
शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या रॅलीने गावातील प्रमुख रस्ते, चौक, वाड्या-वस्त्या यांमधून फेरी काढत संपूर्ण परिसरात मतदानाबाबत जनजागृती केली. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत मतदानाचे महत्त्व पटवून दिले. लोकशाही विषयक घोषणा देऊन नागरिकांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली. नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या समाजप्रबोधनात्मक उपक्रमाचे कौतुक करत आवर्जून मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत प्रतिनिधी, पालकवर्ग तसेच स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभले. ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे, पोलिसपाटील समृद्धी गावडे, आशा सेविका उत्तरा नाईक, अंगणवाडी सेविका संजना गावकर, अमृता कविटकर, संचिता सावंत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक पाटील, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी धर्मराज खंडागळे, आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com