-भिंगळोलीत महिला सक्षमीकरणाचा संदेश

-भिंगळोलीत महिला सक्षमीकरणाचा संदेश

Published on

-rat७p१३.jpg-
P२६O२२६४९
भिंगळोली : भिंगळोली मतदान केंद्र क्र. २४ व २५ वरील महिला सक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या महिला कर्मचारी.
-------
भिंगळोलीत महिला सक्षमीकरणाचा संदेश
सखी मतदान केंद्र; दोन्ही केंद्रांवर वेशभूषाही सारखीच
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ७ ः तालुक्यातील भिंगळोली येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान केंद्र क्र. २४ व २५ येथे दोन सखी मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली. या केंद्रांचे वैशिष्ट्य म्हणजे येथे कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी महिला होत्या. सर्व महिलांनी एकसारख्या गुलाबी रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. त्यामुळे या मतदान केंद्रांना ‘पिंक बूथ’ म्हणूनही ओळख मिळाली.
महिलांचा मतदानाचा टक्का वाढावा, महिला सशक्त व सबल व्हाव्यात तसेच पुरुषांप्रमाणे मतदान केंद्राचे सर्व काम महिलांनीच समर्थपणे पार पाडावे, या उद्देशाने ही संकल्पना राबवण्यात आली. मंडणगड तालुक्यात प्रथमच अशा प्रकारची दोन सखी मतदान केंद्रे उभारण्यात आली. या मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्ष म्हणून मानसी पालांडे व संगीता घाडगे यांच्या नेतृत्वाखाली महिलांची टीम कार्यरत होती. हे कार्य निवडणूक निर्णय अधिकारी वीरसिंग वसावे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com