कोकण
रमेश दळवी यांचे निधन
लोगो ः निधन
23675
रमेश दळवी
दोडामार्ग, ता. १० : बोडदे टेंबवाडी येथील रमेश अर्जुन दळवी यांचे सोमवारी (ता. ९) रात्री निधन झाले. त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, माजी सैनिक बँकेचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. सध्या ते भाजपमध्ये ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. तालुक्यात ते ‘आबाजी’ नावाने परिचित होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर गोव्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, दोन विवाहित मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

