एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता
-rat११p१५.jpg-
२६O२३८१२
रत्नागिरी : श्री देव भैरी देवस्थान तळ्याची स्वच्छता करताना अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी.
-------
भैरी देवस्थान तळ्याची विद्यार्थ्यांकडून स्वच्छता
महाराष्ट्र बारव मोहीम ; कचरा, पिशव्या उचलल्या, गाळही काढला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : महाराष्ट्र बारव मोहिमेंतर्गत अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी झाडगाव येथील ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थानच्या परिसरातील तळ्याची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकीची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित केली. या उपक्रमात श्रीरंग मसुरकर आणि कार्यक्रमाधिकारी अभिजित भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
तळ्यात साचलेला कचरा, प्लास्टिक पिशव्या, गाळ आणि इतर घाण काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. देवस्थान परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. ‘स्वच्छता हीच सेवा’ या संदेशाचा प्रसार करत स्वयंसेवकांनी ग्रामस्थांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले.
या स्वच्छतेमुळे तळ्याचे सौंदर्य पुन्हा एकदा खुलले. यातून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश समाजापर्यंत पोहोचला. बारव मोहिमेतील कार्यकर्ते श्रीरंग मसुरकर यांनी स्वयंसेवकांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. महाराष्ट्र बारव मोहिमेअंतर्गत राबवण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन आणि कार्यवाह सतीश शेवडे यांनी स्वयंसेवकांचे कौतुक केले.
---------
चौकट १
बारवाची वैशिष्ट्ये
कोकणात बारव बहुधा मध्ययुगीन काळातील आहेत. ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थानच्या परिसरातील या बारवाला जांभ्या दगडांच्या पायऱ्या करण्यात आल्या आहेत. हे सुंदर बारव भाविक व पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. कोकणातील काही बारवांच्या पुनर्उभारणीसाठी आणि संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

