-मंडणगड येथे ९० वी महाशिवरात्र महोत्सव
खेड, मंडणगड येथे
महाशिवरात्र महोत्सव
खेड, ता. १२ : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, माऊंट अबू संचलित रत्नागिरी जिल्ह्यातील खेड व मंडणगड येथील सेवाकेंद्रामार्फत ९०वा महाशिवरात्र महोत्सव विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. १४ फेब्रुवारीला ब्राह्मणआळी, बेडेकर संकुल येथे सकाळी ११ वा. ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी सायंकाळी ‘बाबा मिलन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १५ला सकाळी ८ नंतर महाशिवरात्रीनिमित्त ध्वजवंदन व ‘सर्व देवतांचा रचिता एक शिव’ या अनोख्या दर्शनाचे उद्टन ९० दीपप्रज्वलनाने करण्यात येणार आहे. प्रसाद वितरण करण्यात येईल. सायंकाळी महाशिवरात्रीनिमित्त मार्गदर्शन व प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. १६, १७ व १८ ला मंडणगड, निगवणी व दहागाव येथे ध्वजवंदन कार्यक्रम होणार आहे. विविध शाळा व महाविद्यालयांतही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ला सायंकाळी चाकाळा पाठशाळेत, १६ला सायंकाळी निगडे पाठशाळेत ध्वजवंदन होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

