​चिताऱआळीवासीयांच्या पाणीप्रश्नाला ''पूर्णविराम''

​चिताऱआळीवासीयांच्या पाणीप्रश्नाला ''पूर्णविराम''

Published on

swt122.jpg
24045
सावंतवाडी ः चितारआळी येथे विहिरीच्या भूमिपूजनप्रसंगी नार्वेकर कुटुंबीय व मान्यवर.

​चितारआळीवासीयांच्या
पाणीप्रश्नाला ‘पूर्णविराम’
विहिरीचे भूमिपूजन ः नार्वेकर कुटुंबीयांचे दातृत्व
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः शहरातील चितारआळी येथील तालुका स्कूलच्या प्रांगणात नार्वेकर कुटुंबीयांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विंधन विहीर (बोअरवेल) उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शाळेसह परिसरातील पाण्याची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार असून, नार्वेकर कुटुंबीयांच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
​​या विंधन विहिरीचे भूमिपूजन सामाजिक कार्यकर्ते तथा सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मंदार नार्वेकर यांच्या मातोश्री कविता नार्वेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. नार्वेकर कुटुंबीयांनी शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी दाखवलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
​याप्रसंगी उद्योजक मनोज नार्वेकर, मंदार नार्वेकर, मनीषा नार्वेकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, शांती सावंत, अंकिता काणेकर, ज्योती मुद्राळे, वैष्णवी मुद्राळे, बाबल वाडकर, महेश सुकी, चंद्रकांत नाईक, नीलेश वेर्णेकर, राघू चितारी, प्रकाश पोतनीस, प्रकाश चितारी तसेच माठेकर व सावंत परिवारातील सदस्य आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, विहिरीचे खोदकाम पूर्ण झाले असून या विहिरीला भरपूर पाणीसाठा लागला आहे. कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या प्रांगणातच पाण्याचा हा स्त्रोत उपलब्ध झाल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या कार्याबद्दल पंचायत समिती प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांनी नार्वेकर कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com