''स्वराज्य''ने शिवविचार घराघरात पोहोचविले

''स्वराज्य''ने शिवविचार घराघरात पोहोचविले
Published on

swt124.jpg
O24047
बांदा ः चित्रकला स्पर्धेचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना उपसरपंच राजाराम धारगळकर. सोबत इतर.

‘स्वराज्य’ने शिवविचार घराघरात पोहोचविले
राजाराम धारगळकर ः बांद्यात जिल्हास्तर रंगभरण, चित्रकला स्पर्धेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १२ ः शिवविचार घराघरात पोहोचविण्याचे चांगले कार्य स्वराज्य प्रतिष्ठान करत आहे. बांदा शहरात मुलांसाठी विविध स्पर्धा राबवून त्यांना शिवकार्यात सामावून घेण्याचे शिवधनुष्य प्रतिष्ठानने हाती घेतले आहे, हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन बांदा उपसरपंच राजाराम धारगळकर यांनी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी येथे केले.
श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने येथील पीएमश्री केंद्रशाळा क्र. १ मध्ये आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रंगभरण व चित्रकला तसेच शिवगीत गायन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत तब्बल ४०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन उपसरपंच धारगळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश मोरजकर, केदार कणबर्गी, समीर परब उपस्थित होते. रंगभरण स्पर्धा विविध शालेय तसेच खुल्या गटात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट चित्रांचे रेखाटन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे ः रंगभरण-अंगणवाडी ते पहिली गट-रुद्रानी पंडित (अंगणवाडी बांदा), धनश्री देसाई (केंद्रशाळा बांदा क्र. १), रामिका गोरड (अंगणवाडी मोरगाव), नीतेश धुरी (केंद्रशाळा बांदा क्र. १), सौम्या शेर्लेकर (दिव्य ज्योती स्कूल, बांदा). दुसरी ते चौथी-प्रार्थना नाईक (स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल कोलगाव), स्वप्नील गावडे (घारपी), मिताली साळगावकर (व्ही. एन. नाबर हायस्कूल मडुरा), वेदश्री कल्याणकर (दिव्य ज्योती बांदा), वेदांत वीर (बांदा क्र. १). पाचवी ते सातवी गट-देवांशू चितारी (कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी), सृष्टी परब (दिव्य ज्योती बांदा), ग्रीषा परब (दिव्य ज्योती बांदा), गार्गी भोगन (मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी), अयान करपे. आठवी ते दहावी गट ः वेणू सावंत (कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी), जीन्येषा भैरे (नेमळे माध्यमिक विद्यालय), अथर्व शेडगे, दुर्वा दाभोलकर (कळसुलकर हायस्कूल), गौरी शिर्के.
अकरावी ते खुला गट ः राजेश आजगावकर, केदार टेमकर, सेजल गावडे (भोसले कॉलेज सावंतवाडी), तन्वी कुडव, सूर्यकांत चव्हाण.
शिवगीत गायन स्पर्धा ः पाचवी ते सातवी गट-चिन्मयी मेस्त्री (इन्सुली क्र. ४), सर्वज्ञ वराडकर (बांदा क्र. १), आर्या ठाकर (बांदा क्र. १). आठवी ते दहावी गट-वृक्षदा देसाई-कळंगुटकर (दिव्य ज्योती बांदा), नैतिक मोरजकर (खेमराज हायस्कूल बांदा).
खुला गट ः श्रुती पोपकर (इन्सुली), प्राची दळवी. दोन्ही स्पर्धांचे परीक्षण यामेश खवणेकर, महेंद्र मांजरेकर यांनी केले. सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण गुरुवारी (ता. १९) येथील केंद्रशाळेत होणाऱ्या शिवजयंती मुख्य सोहळ्यात करण्यात येणार आहे.
यावेळी शुभम बांदेकर, जे. डी. पाटील, रीना मोरजकर, रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष रोहन कुबडे उपस्थित होते. जे. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com