विद्वानांचे कार्य पुढे नेण्याची आपली जबाबदारी
-rat१२p१३.jpg-
२६O२४०५३
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्रात बोलताना डावीकडून डॉ. आशिष बर्वे, डॉ. कल्पना आठल्ये व डॉ. अनघा जोशी
----
विद्वानांच्या कार्यातून युवकांना प्रेरणा
डॉ. आशिष बर्वे ; संस्कृत उपकेंद्रात कार्यशाळेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : कोकणात प्रत्येक क्षेत्रात अनेक विद्वान होऊन गेले. खासकरून संस्कृत भाषेतील विद्वानांचे कार्य आजच्या युवकांना विशेषतः प्रेरणादायी आहे. त्यामुळे हे कार्य पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आता आपली आहे, असे प्रतिपादन श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष बर्वे यांनी केले.
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राच्यावतीने आयोजित कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान या चर्चासत्राच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते.
मूळचे कोकणातील असणारे सर रामचंद्र गोपाळ भांडारकर यांनी कार्यकौशल्याच्या भारताच्या सांस्कृतिक परंपरेकडे वैज्ञानिक, ऐतिहासिक, संशोधनात्मक पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन दिला, असे भांडारकर हे आधुनिक भारतातील संस्कृत संशोधनाचे शिल्पकार आहेत, असे प्रतिपादन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या व संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले. त्यांनी विविध शिलालेख, हस्तलिखिते, नाणी तसेच विविध लिपी यांचा सूक्ष्मपणे अभ्यास केला. संस्कृतची तोंडओळख करवून देणारे व संस्कृत भाषेचा व्याकरणदृष्ट्या पाया मजबूत करणारे भांडारकर पुस्तक पहिले व दुसरे लिहिल्याचे त्यांनी सांगितले.
------
चौकट
डॉ. काणे यांचा धर्मशास्त्र ग्रंथ अद्वितीय
भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांनी धर्मशास्त्राची केलेली मांडणी आदर्शवत आहे. कारण डॉ. काणे यांनी धर्मशास्त्रात हक्कापेक्षा कर्तव्यावर अधिक भर दिलेला आहे शिवाय यात दुसऱ्याचे हितरक्षण आणि स्वकर्तव्य यांना अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे, म्हणूनच भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणेंचा धर्मशास्त्र ग्रंथ सर्वार्थाने अद्वितीय आहे, असे पुणे विद्यापीठातील संस्कृत व प्राकृत विभागातील डॉ. अनघा जोशी यांनी केले. डॉ. काणेंच्या धर्मशास्त्रात कर्तव्य, अधिकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे प्रकर्षाने जाणवते. धर्मशास्त्रात केवळ व्रतवैकल्ये, पूजापाठ, पद्धती यांचाच समावेश नसून व्यक्ती समाजात वावरताना तिची कर्तव्ये, तिचे संस्कार, कायदे, आचारधर्मसारख्या बाबींचा समावेशदेखील होतो असे डॉ. जोशी म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

