वेंगुर्ले रामेश्वर मंदिरात महाशिवरात्रोत्सवास प्रारंभ

वेंगुर्ले रामेश्वर मंदिरात महाशिवरात्रोत्सवास प्रारंभ

Published on

swt1211.jpg
24074श्री रामेश्वर

वेंगुर्ले रामेश्वर मंदिरात
महाशिवरात्रोत्सवास प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १२ ः येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात बुधवारपासून (ता. ११) महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला. यादिवशी सकाळी उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात आले. उद्या (ता. १३) सायंकाळी ७ वाजता येथील रामेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग, शनिवारी (ता. १४) सायंकाळी ७ वाजता दत्त प्रासादिक भजन मंडळ, कुबलवाडा यांचे भजन, रविवारी (ता. १५) सकाळी धार्मिक विधी, रात्री सातेरी मंदिरातून तरंगदेवतांचे आगमन, तरंग देवतांसह श्री रामेश्वराची पालखी व लालखी प्रदक्षिणा, तरंग देवतांकडून रथावर नारळ वाढवून रथ प्रदक्षिणेस सुरुवात होईल. रथ प्रदक्षिणेनंतर नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. श्रींच्या दर्शनाचा आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com