

swt1214.jpg
24090
मालवण ः विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या वतीने आयोजित रील्स स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
हिंदू राष्ट्राला भक्कम करण्यासाठीच रील्स स्पर्धा
पालकमंत्री नीतेश राणे : आंगणेवाडीत स्पर्धा बक्षीस वितरण
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १२ : मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि आमदार म्हणून कार्य करत असलो, तरी त्याही आधी मी एक ''कट्टर हिंदू'' म्हणून तुमच्या सोबत सदैव उभा आहे. आपल्या हिंदू समाजाला बळकट करणे आणि त्याची सुरक्षा करणे, हे माझे परम कर्तव्य आहे. ही रील स्पर्धा केवळ स्पर्धा नसून हिंदू राष्ट्राला भक्कम करण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे यांनी आंगणेवाडी येथे केले.
‘कोकणची काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रेचे औचित्य साधून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सिंधुदुर्ग यांच्या वतीने हिंदू धर्मावर होणारी विविध आक्रमणे, लव्ह जिहाद, लव जिहाद आणि धर्मांतर यांसारख्या गंभीर विषयांवर जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या ‘रील्स’ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे प्रभावी शस्त्र आहे. हे ओळखून विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील ‘रील्स स्टार्स’ नी लव्ह जिहाद आणि धर्मांतरासारख्या ज्वलंत विषयांवर प्रभावी सादरीकरण केले. जत्रेला आलेल्या हजारो भाविकांसाठी मंदिराशेजारील कार्यालयात मोठ्या स्क्रीनद्वारे हे रील्स प्रदर्शित करण्यात आले. विश्व हिंदू परिषद प्रदेश मंत्री मोहन साळेकर यांनी जात-पात विसरून केवळ ''हिंदू'' म्हणून एकत्र येण्याचे आवाहन केले.
स्पर्धेतील विजेते असे ः प्रथम संकेत हसोळकर व टीम, द्वितीय सोलकढी साऊथची, तृतीय ऋग्वेद केरकर व टीम. वैयक्तिक श्रेणीतील विजेते-उत्कृष्ट अभिनेता मकरंद मयेकर, उत्कृष्ट अभिनेत्री ''मी सोलकढी साऊथची'', उत्कृष्ट बाल कलाकार-विघ्नेश मसुरकर, उत्कृष्ट लेखन-स्वर्गातलो कोकण, उत्कृष्ट दिग्दर्शन-हापूस गँग, निर्मिती नियोजन-सिद्धेश चव्हाण, अरूश्री सावंत, मथुरा सावंत, संगीता सावंत, शीतल मसुरकर, अनुषा पिळाई, रीना मराळ, मीनाक्षी सावंत-भोसले यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जुबेर खान यांचा ''धर्मरक्षक मित्र'' म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्याला आनंद प्रभू, कृष्णा धुरपंवर, दत्तप्रसाद ठाकूर, गणेश चव्हाण, अमोल गावडे, भाऊ सामंत, नंदकुमार आरोलकर, चिन्मय रानडे, विलास हडकर, शिल्पा खोत, हरेश पडते, श्रीराज बादेकर, तेजस चव्हाण, प्रसाद हळदणकर, स्वप्नील घाडी, पार्थ डिचवलकर, सिद्धनाथ नाटेकर, नीलेश साळगावकर, अथर्व केसरकर, सचिन वराडकर, गजानन मांजरेकर उपस्थित होते. लारा मयेकर यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.