बांदा विठ्ठल मंदिरात दासनवमी उत्साहात

बांदा विठ्ठल मंदिरात दासनवमी उत्साहात
Published on

बांदा विठ्ठल मंदिरात
दासनवमी उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १२ ः येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे श्री रामदास नवमीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात झाला. त्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सकाळी मंदिरात श्री विठ्ठल रखुमाईची नित्यपूजा व श्री रामदास स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दुपारी राम नामाचे सामूहिक नामस्मरण, त्यानंतर नैवेद्य अर्पण करून महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी ७ वाजता मंदिरात नित्य सायंआरती व त्यानंतर स्थानिक भजनसेवेकऱ्यांची भजन सेवा झाली. या सोहळ्यानिमित्त शेकडो भाविकांनी दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला.
................
swt1217.jpg
24120
पाट ः विद्यालयातर्फे यज्ञा साळगावकर यांचा सत्कार करण्यात आला.

यज्ञा साळगावकरांचा
पाट प्रशालेत सत्कार
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १२ः जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये यश संपादन केलेल्या यज्ञा साळगावकर यांचा पाट हायस्कूलतर्फे सत्कार करण्यात आला. त्या पाट हायस्कूलच्या सहशिक्षिका आहेत. हा सन्मान स्वीकारताना त्यांनी, मी या शाळेची विद्यार्थिनी असून येथील संस्कार माझ्या यशामध्ये उपयोगी पडले, असे सांगितले. यापुढे पदाला न्याय देण्याचे कार्य करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मुख्याध्यापक श्री. काळे, संस्थेच्या वतीने कार्यवाह विजय ठाकूर, संचालक राजेश सामंत यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्था प्रतिनिधी बाबा तळवळेकर, सुधीर मळेकर, दीपक पाटकर उपस्थित होते. संदीप साळसकर यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक बोंदर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com