श्रमसंहिता रद्द करण्याची मागणी

श्रमसंहिता रद्द करण्याची मागणी

Published on

-rat१२p१७.jpg-
२६O२४०६७
रत्नागिरी : श्रमसंहिता रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे आज देताना एमएसएमआरए रत्नागिरी युनिटचे श्रीरंग प्रभुदेसाई, समीर आठवले, अविनाश वानखेडे, संजय गद्रे, यशवंत धूपकर, श्रीपाद देवदास.
-----
कामगारविरोधी श्रमसंहिता रद्द करा
वैद्यकीय प्रतिनिधींची मागणी; निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : केंद्र सरकारने कामगार हक्कांशी संबंधित २९ कायद्यांचे परिवर्तन करून चार ‘श्रमसंहिता’ अर्थात् लेबरकोड तयार केले आहेत. ही श्रमसंहिता कॉर्पोरेट कंपन्यांच्या हिताची असून, कामगार हिताविरोधी असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. श्रमसंहिता कामगारहितविरोधी असल्याने ती रद्द करून पूर्वीचे कामगार कायदे लागू करावेत, अशा मागणीचे निवेदन आज रत्नागिरीतील वैद्यकीय प्रतिनिधींनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे दिले.
श्रमसंहिता रद्द करण्याच्या मागणीसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनने (सिटू) आज देशव्यापी संप पुकारला. या संपात फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनमधील (एमएसएमआरए) संघटनाही सहभागी झाल्या आहेत. ‘एमएसएमआरए’च्या रत्नागिरी शाखेचे सचिव श्रीरंग प्रभुदेसाई, कोषाध्यक्ष समीर आठवले यांच्यासह अविनाश वानखेडे, संजय गद्रे, यशवंत धूपकर, श्रीपाद देवदास यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत विविध मागण्या मांडल्या.
संप करणाऱ्या संघटनांच्या म्हणण्यानुसार, या श्रमसंहिता केवळ कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्याच्या असून, कामगारांचे शोषण करणाऱ्या आहेत. यामुळे रोजच्या कामाचा कालावधी १२ तासांपर्यंत वाढू शकतो. कायमस्वरूपी नोकऱ्या यामुळे संपुष्टात येणार असून, तात्पुरत्या स्वरूपाच्या, कंत्राटी पद्धतीच्या नोकऱ्याच शिल्लक राहतील. संप करण्याच्या अधिकारावर आणि युनियन तयार करण्यावरही गदा येणार आहे. यामुळे सामाजिक सुरक्षा कमजोर होणार असून, ईएसआयसी, पीएफ अशा सुविधांची कोणतीही खात्री देता येणार नाही.
--------
चौकट १
किमान वेतनावर दुष्परिणाम
किमान वेतन, बोनस आणि ग्रॅच्युइटी मिळण्यावरही याचा दुष्परिणाम होणार आहे. इतक्या साऱ्या वाईट गोष्टींमुळे श्रमसंहिता रद्द करून केंद्र सरकारने जुने कामगार कायदे पुन्हा लागू करावेत, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com