

सभापतिपदाची तीन महिलांना संधी
राजापुरात महिला आरक्षण ; नवव्यांदा मिळणार मान
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १२ ः राजापूर पंचायत समिती निवडणुकीनंतर सभापती आणि उपसभापती निवडीचे वेध लागले आहेत. सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित आहे. आत्तापर्यंत आठ महिलांनी सभापतिपद भूषवले आहे. आता नवव्यांदा महिला सभापती होणार आहे.
सभापतिपदासाठी सध्या तळवडे गणातून निवडून आलेल्या अपेक्षा मासये, ताम्हाणेतून समिक्षा वाफेलकर, नाटे गणातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नंदिनी कदम यांच्यासह यापूर्वी उपसभापतिपद भूषवलेल्या आणि केळवली गणाच्या सदस्य भाग्यश्री लाड यांची नावे चर्चेत आहेत. नंदिनी कदम यांच्यामुळे पंचायत समितीमध्ये पहिल्यांदा अपक्ष सदस्य निवडून आला आहे. कदम या अपक्ष असल्या तरी त्यांचे शिवसेनेला पाठबळ राहणार आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेकडून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या महिला सदस्याला सभापतिपदासाठी संधी दिली जाणार की, अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सदस्याला संधी देऊन इतिहास रचला जाणार, याकडे लक्ष आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.