

-rat१२p२३.jpg-
२६O२४११७
रत्नागिरी ः आशा व गटप्रवर्तक महिला विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करत जिल्हा परिषदेवर धडकल्या.
-----------
पेन्शन द्या, अन्यथा वय वाढवा
आशा व गटप्रवर्तक संघटनेची ठाम भूमिका ; जिल्हा परिषदेवर निदर्शने
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : आशा व गट प्रवर्तक महिलांना वयाची ६० वर्षे पूर्ण होताच सेवेतून बाजूला काढणे, हा त्यांच्या घटनात्मक हक्कांचा भंग आणि घोर अन्याय आहे. सरकारने सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करावे अन्यथा उच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेने दिला. देशव्यापी लाक्षणिक संपाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील शेकडो आशा स्वयंसेविकांनी जिल्हा परिषदेवर धडक देत जोरदार निदर्शने केली.
संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी आणि जनरल सेक्रेटरी सुमन पुजारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांना निवेदन देण्यात आले. सरकारने तत्काळ निर्णय घेतला नाही तर दरमहा पाच हजार रुपये पेन्शन आणि ग्रॅच्युइटी देणे शासनावर बंधनकारक असेल, असेही संघटनेने ठणकावून सांगितले आहे. आंदोलक महिलांनी प्रशासकीय छळवणुकीचा पाढाच वाचला. अनेक प्राथमिक आरोग्यकेंद्रांमध्ये आशा स्वयंसेविकांकडून मोबदल्याशिवाय ऑनलाइन कामे, डाटा एन्ट्री आणि सर्व्हेची सक्ती केली जात आहे. काम न केल्यास कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हे वर्तन ‘पॉश कायदा २०१३’ नुसार गुन्हा असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील बहुसंख्येने आशा व गटप्रवर्तक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.