‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन-२०२६’ आज

‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन-२०२६’ आज

Published on

रत्नागिरीतून सुरुवात; किनारी, सागरी सुरक्षेबाबत जनजागृती

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी, ता. १३ : देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षादलातर्फे (सीआयएसएफ) १४ फेब्रुवारीला रत्नागिरीतील पोलिस मैदानावर ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन २०२६’ या विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे.

सीआयएसएफच्या ५७ वर्षांच्या गौरवशाली सेवेच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचा आरंभ उद्योग व मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृती करणे, राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करणे, तंदुरुस्ती व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे, तसेच महिला सक्षमीकरणाला चालना देणे, हा या सायक्लोथॉनचा प्रमुख उद्देश आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून किनारी भागातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे, नागरिक आणि सीआयएसएफ यांच्यात समन्वय वाढविणे, तरुण पिढीला अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत सजग करणे, तसेच बंदर सुरक्षेतील सीआयएसएफच्या ५१ वर्षांच्या अनुभवाची माहिती देणे, यावर भर देण्यात येणार आहे. १९६९ ला स्थापन झालेल्या सीआयएसएफने गेल्या ५७ वर्षांत रिफायनरी, विमानतळ, बंदरे, मेट्रोरेल्वे, अणुऊर्जा प्रकल्प, अंतराळ केंद्रे आदी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा यशस्वीपणे सांभाळली आहे. सुरक्षेपुरतीच मर्यादित न राहता सामाजिक उपक्रम, जनजागृती मोहीम आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या कार्यक्रमांद्वारे सीआयएसएफ राष्ट्रीय सेवेची बांधिलकी

जपत आहे.

‘वंदे मातरम्' या देशभक्तीपर गीताच्या १५०व्या वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कोस्टल सायक्लोथॉनमध्ये देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून सुमारे ६ हजार ६०० किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार असून, या उपक्रमाचा समारोप कोची येथे होणार आहे. गेल्यावर्षी झालेल्या सायक्लोथॉन २०२५ला ३० लाखांहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता, तर सुमारे २.९ कोटी डिजिटल संवाद नोंदविण्यात

आले होते.

५२ किनारी गावे ‘तटप्रहरी’ म्हणून दत्तक

सामाजिक सहभागाच्या माध्यमातून ५२ किनारी गावे ‘तटप्रहरी’ म्हणून दत्तक घेण्यात आली असून, या गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग, वैद्यकीय सेवा, खुली व्यायामशाळा, क्रीडा सुविधा तसेच तस्करी व बेकायदेशीर घुसखोरी रोखण्याबाबत जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com