रत्नागिरी-''वामन आख्याना''तून उलगडले कलावंतांचे वास्तव
राज्य नाट्यस्पर्धा--लोगो
rat13p5.jpg-
24260
रत्नागिरी ः प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉर्डन कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गणेशखिंड-पुणे या संस्थेने सादर केलेल्या ‘वामन आख्यान’ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
--------
‘वामन आख्याना’तून उलगडले कलावंतांचे वास्तव
मॉर्डने महाविद्यालय ; दशावतारातील नाटकाने अंतर्मुख केले
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ः कोकणातील लोककला ''दशावतार'' प्रचलित आहे; पण या मनोरंजनाच्या साधनातून कलाकारांना नाव मिळते; पण त्यांच्या पोटापाण्याचं काय? तरीही सामाजिक बांधिलकी जपत हे कलाकार लोककला सादर करत असतात. या कलाकारांचे जगण, लोककला जिवंत राहावी याची तळमळ पुणे येथील मॉर्डन महाविद्यालयाने ‘वामन आख्यान’ या नाटकातून मांडली. राज्य नाट्यस्पर्धेत येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा प्रयोग झाला. लेखक प्रांज्वळ पडळकर यांच्या संहितेला दिग्दर्शक शुभंकर वाघोले यांनी उत्तम साज दिला. संगीत, अभिनय, नेपथ्य, रंगभूषा, प्रकाशयोजना अशा चोहोबाजूंनी नाटक रंगतदार झाले.
काय आहे नाटक ?
‘वामन आख्यान’ या नाटकाची सुरवात “हृदयाच्या तालावर नाचे गणेशू” या गीताने होते. दशावतारातील वामन अवताराची कथा रंगमंचावर उलगडते. नारदाचा “कुणी गोविंद म्हणा, कुणी गोपाळ म्हणा” या गीतासह प्रवेश होतो. तो त्रिखंडात माजलेल्या हाहाकाराची माहिती विष्णूला देतो. दैत्यराज बळी, त्याचा गुरू शुक्राचार्य आणि वामन अवतार यांमधील प्रसंगातून वामन तीन पावले चालून बळीला पाताळात पाठवतो, हा दशावतारातील मुख्य पौराणिक भाग साकारला जातो.
या पौराणिक कथेबरोबरच नाटकात दशावतार करणाऱ्या कलाकारांचे वास्तव जीवनही मांडले आहे. रंगपूजेवरून कलाकारांमध्ये वाद होतो. भूजुर्ग काका आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसा उभा करू न शकल्याने दशावतार सोडण्याचा निर्णय घेतात; मात्र वामनची भूमिका साकारणारा कलाकार आणि इतर सहकारी मिळून त्यांना आर्थिक मदत करतात आणि दशावतार सुरू ठेवण्याची विनंती करतात. दुसरीकडे, वामनच्या वैयक्तिक आयुष्यात लग्नाची बोलणी सुरू असतात.
“दशावतार करणाऱ्या मुलाला कोण मुलगी देणार?” या भावनेतून वामन लग्नास नकार देत असतो. तरीही सरिता खंडबेल आणि वामन चौलकर यांचे लग्न ठरते. सरिता अट घालते की, वामनने दशावतार सोडून नोकरी करावी. लग्नाची पत्रिका छापली जाते. लग्नाआधी वामन पुन्हा दशावतारात काम करतो, हे कळल्यावर सरिता त्याच्यावर रागावते व त्यांच्यासोबतचे नाते तोडते. वामन निराश होऊन घरी परततो; मात्र दुसऱ्या दिवशी गावात पुन्हा दशावताराचा प्रयोग असतो आणि वामनच वामनाची भूमिका साकारत असतो. त्या प्रयोगाला सरिताही उपस्थित असते. नारदाची भूमिका करणारा कलाकार वामनने ती भूमिका का स्वीकारली, यामागील सत्य सांगतो. मरणाच्या दारात असलेल्या एका मुलीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी. त्या मुलीच्या वडिलांनी आयुष्यभर पुरेल इतका पैसा देऊ केला तरी वामनने तो नाकारला आणि केवळ तिच्या इच्छेसाठी भूमिका साकारली. हे सत्य समजल्यावर सरिताचे मत बदलते. ती दशावतारातील वामनाची लक्ष्मी आपणच असणार असल्याचे जाहीर करते आणि वामनसोबत लग्नास तयार होते. २५ कलाकारांचा प्रभावी अभिनय, नेपथ्य, संगीत आणि प्रकाशयोजना यांमुळे ‘वामन आख्यान’ लोकलेतील प्रेक्षकांसाठी एक रंगतदार व भावस्पर्शी अनुभव ठरतो.
* सूत्रधार आणि सहाय्य
नेपथ्य ः ऋतुजा बोठे, प्रकाशयोजना ः निखिल मारणे, साहिल वाईकर, रंगभूषा ः अरविंद सूर्य, वेशभूषाः दिक्षा कुळे, संगीत दिग्दर्शन ः अभिजित पटवर्धन. म्युझिक ऑपरेटर ः मनीष मोरे, अहाना दिंडोरकर, गायक ः जय पेडणेकर, चिन्मयी तांबे, पार्थ गरूड. ऑर्गन व संवादिनी ः राजस आपटे, पखवाज-तबला ः धीरज बडे, बासरी ः निखिल आठवले.
* पात्र परिचय
वामन चौलकर ः प्रांज्वल पडळकर, सरिता खंडबले ः केतकी भालवणकर, प्रकाश माळी ः विराज दिघे, कल्पना (वामनची आई) ः दिक्षा कुळ्ये, आजी ः श्रुती परदेशी, बाप-बोजेवाला ः पुष्पराज भन्साळी, लहान सरिता ः अहाना दिंडोरकर, मामा ः हर्षल कानवडे, दत्तू, सरिताचे मामा, उमेश ः अनिकेत खरात, गणपती-सोम्या ः अथर्व सोनवणे, शुक्राचार्य-नाऱ्या ः अथर्व तपस्वी. वामन-पतू ः नीरज कोलगी, रिद्धी, लक्ष्मी-गणू ः अनोष ठोंबे, मुलगी ः सायली इंगोले, सिद्धी-रम्या ः समर्थ शहा, वामनचे बाबा ःरोहित जोशी, वैदेही ः सिद्धी निघोट. मावशी ः खुशी जाधव, ओंक्या ः ओंकार सोलशे, हिम्याः हिमांशू भारंबे, ओम्या ः ओम ढोके, ऋचा ः ऋचा देखमुख, श्रुती ः श्रुती तोळनूर, संकेत ः संकेत मिटकर, मुलीचे बाबा ः शुभंकर वाघोले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

