नवनिर्वाचीत सदस्यांचा कोर्लेत सत्कार
24312
नवनिर्वाचित सदस्यांचा कोर्लेत सत्कार
ग्रामपंचायतीतर्फे आयोजन; सरपंचांसह सदस्यांचाही गौरव
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १२ : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत पोंभुर्ले व पुरळ जिल्हा परिषद गटातील व पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा तालुका भाजप मंडल अध्यक्ष महेश ऊर्फ बंड्या नारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोर्ले (ता. देवगड) ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार करण्यात आला.
कोर्ले ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा पाच वर्षांतील कार्यकाळ संपत असल्याने सरपंच विश्वनाथ खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह गावातील सर्वच क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केला होता. यानिमित्ताने गावातील महिलांसाठी हळदी-कुंकू व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्याचा निरोप समारंभाचेही आयोजन केले होते. यावेळी पोंभुर्ले जिल्हा परिषद सदस्या सौ. अनुराधा नारकर, पुरळ जिल्हा परिषद सदस्य संजय बोबडी, पोंभुर्ले पंचायत समिती सदस्य सादिक डोंगरकर, फणसगाव पं.स.सदस्य समृद्धी चव्हाण, पडेल पं. स. सदस्य अंकुश ठुकरुल, देवगड पं.स. माजी सभापती रवी पाळेकर पडेल सरपंच भूषण पोकळे, पोंभुर्ले सरपंच सौ प्रियंका धावडे, धालवली उपसरपंच अनिल राणे, वघिवरे माजी सरपंच संतोष चव्हाण, कुणकवण माजी सरपंच मंगेश गुरव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सौ. नारकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महारांजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर कोर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच खानविलकर यांच्या हस्ते सत्कारमूर्तींना गौरविले.
यावेळी सौ. नारकर यांनी कुशल संघटक आणि समाज कार्यासाठी प्रामाणिकपणे वाहून घेणारा कार्यकर्ता अशा शब्दात कोर्ले सरपंच श्री खानविलकर यांचा विशेष उल्लेख केला. सौ नारकर व मंडल अध्यक्ष श्री. नारकर यांच्या शुभहस्ते श्री. खानविलकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर देताना, पद असो वा नसो सदैव आपल्या गावच्या विकासासाठी शेवट पर्यंत आपण झटत राहणार असून गावचा कारभार हाकताना गावकऱ्यांनी दिलेली खंबीर साथ मी कधीच विसरणार नाही असे उद्गार यावेळी त्यांनी काढले. यावेळी गावातील महिलांसाठी आयोजित करण्यात असलेल्या हळदी-कुंकू समारंभाचा प्रारंभ सौ. नारकर व समृद्धी चव्हाण यांच्या हस्ते महिलाना वाण वाटून करण्यात आली. उपसरपंच सुनील कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामविकास अधिकारी श्री. पाताडे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

