पायलाग लसीकरणाला नेरूळ येथून आरंभ
24317
पायलाग लसीकरणाला
नेरूळ येथून सुरुवात
कुडाळ, ता. १३ : केंद्र पुरस्कृत पायलाग रोगाच्या प्रतिबंधक लसीकरणाची तालुक्यातील नेरूर येथे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर व पंचायत समिती सदस्य श्रीमती दीप्ती नाईक यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.
नेरूर सरसोली धाम येथील गोशाळेतील १४० पशुधनास लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून आज ४८ पशुधनास लसीकरण करण्यात आले. उपक्रमाच्या सुरुवातीस श्रीमती नाईक यांच्याकडून गोमातेची पूजा झाल्यावर पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली. तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी डॉ. अभिजित कसालकर यांनी उपस्थित पशुपालकांना पायलाग लसीकरणाचे महत्त्व, तसेच लसीच्या रोगाबाबतचे निर्मूलन याबाबतचे महत्त्व विषद केले. पायलाग लसीकरण केलेले पशुधन हे खात्याच्या संगणक प्रणालीवर नोंदविण्यात येणार असल्याने त्याबाबतची पद्धती व जनावरांच्या संगणक प्रणालीतील महत्त्व सांगितले. मोहीम यशस्वी करण्याकरिता एस. पी. फणसेकर, श्रीमती धनश्री परब-शेडगे, श्रीमती समिरा केरकर, सूचित खवणेकर, सुभाष सज्जन यांनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

