रत्नागिरीत वेदमूर्ती मुरवणे गुरुजींचा सत्कार
रत्नागिरीत वेदमूर्ती मुरवणे गुरुजींचा सत्कार
संस्कृत पाठशाळेत २० ते २२ दरम्यान ‘परशुराम चरित्रकथा’
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : झाडगाव येथील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेत सध्या ऋग्वेद घनपारायण सुरू असून, त्यानिमित्त २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान दररोज सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत पुण्याचे प्रणव गोखले यांच्या वाणीतून ‘परशुराम चरित्रकथा’ आयोजित करण्यात आली आहे. तसेच २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता वेदमूर्ती घनपाठी दत्तात्रेय महादेव मुरवणे गुरुजी यांचा सत्कार समारंभ होणार आहे.
वेद आणि शास्त्र क्षेत्रातील दोन मान्यवर विभूती—वैदिकमार्तंड, वैदिक शिरोमणी (कै.) विनायक आठल्ये गुरुजी तसेच व्याकरणाचार्य (कै.) पु. ना. फडके शास्त्री—यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेली पाच वर्षे या पाठशाळेत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच परंपरेतून २५ डिसेंबर २०२५ पासून कंठस्थ ऋग्वेद घनपारायणाला प्रारंभ झाला आहे.
या संदर्भात माहिती देताना संस्कृत पाठशाळेचे ओंकार पाध्ये म्हणाले, प्राचीन काळापासून भारतीय वैदिक परंपरेचे संवर्धन गुरुकुल शिक्षणपद्धतीमुळे शक्य झाले. गुरूमुखातून प्राप्त झालेली वेदविद्या आजच्या विज्ञानयुगातही अक्षर, मात्रा आणि स्वर यांत किंचितही बदल न होता मौखिक परंपरेतून जपली गेली आहे. वेदाध्ययनासाठी प्रखर बुद्धिमत्ता, वेदनिष्ठा आणि कठोर परिश्रमाची तयारी आवश्यक असते. पारंपरिक पद्धतीने वेदाध्ययन करताना घनपाठापर्यंतचे अध्ययन पूर्ण करण्यास सुमारे बारा वर्षांचा कालावधी लागतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

