गुहागरमध्ये शिवरात्रीनिमित्त व्याडेश्वर महोत्सव
व्याडेश्वर महोत्सवाचे
गुहागरमध्ये आयोजन
गुहागर, ता. १३ ः शहरातील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सवानिमित्त १५ फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीनिमित्त इसवीसन एक पूर्वीच्या प्राचीन नाण्यांचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर १७ ते १९ फेब्रुवारी असा तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव मोठ्या दिमाखात दरवर्षी साजरा केला जातो. १५ ला सकाळी ७ ते ९.३० या वेळेत श्रींची षोडशोपचार पूजा व लघुरूद्र, १०.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शहरातील विविध मंडळांची सुस्वर भजने, दुपारी १२ वा. महाआरती, रात्री ७.३० ते ९.३० या वेळेत श्री व्याडेश्वर दिंडी सेवा मंडळ चिखली यांचे वारकरी कीर्तन, १० वाजता श्रींची पालखीतून मिरवणूक काढण्यात येणार आहे. यादिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड कसाल येथील ओंकार कदम यांनी संकलीत केलेल्या इसवी सन ०१ पूर्वीची २२० देशातील नाणी व चलनाचे प्रदर्शन, सकाळी ९ ते सायंकाळी ६ वेळेत श्री व्याडेश्वर मदिरात तब्बल १००० नाणी व चलनाचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
१७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान श्रीदेव व्याडेश्वर महोत्सव शहरातील पोलिस कवायत मैदान येथे साजरा होणार आहे. १७ ला सायंकाळी ६.३० वा. या महोत्सवाचे उदघाटन होईल. जादुचे प्रयोग सादर केले जाणार आहेत. त्यानंतर प्रसिद्ध अभिनेता विघ्नेश जोशी यांचे पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा देताना ''मराठी असे आमची मायभूमी'' असा गप्पा, गाणी व किस्से हा कार्यक्रम, स्थानिक कलाकारांचा गुणदर्शनाचा कार्यक्रम होईल. कोकणातील प्रसिद्ध संकासूर नमन सादर केले जाणार आहे. १८ ला सायंकाळी ६.३० वाजता पुन्हा कलाआविष्कार यांचे कोकणी संस्कृतीची ओळख करून देणारा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शिवगर्जना हा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर केडीसी ग्रुप यांचे विविध नृत्य, नमन होईल. १९ ला सायंकाळी ६.३० वाजता शिवभक्त कोकण हा कार्यक्रम, त्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. शेवटी नमनाने महोत्सवाची होईल.
या महोत्सवासाठी कोकणातील विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच अबालवृद्धांसाठी विविध प्रकारचे खेळ यामध्ये आकाश पाळणा, मुलांची घसरगुंडी, विविध गेम्स आदी मनोरंजनही ठेवण्यात आले आहे. या महाशिवरात्र महोत्सवात सर्व भक्तांनी तसेच जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीदेव व्याडेश्वर देवस्थान विश्वस्तांनी केले आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

